महाराष्ट्र केसरीं मल्लांच्या पेन्शनबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली – ना. रामराजे नाईक-निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल जे आहेत. त्यांनी आपली करिअर या खेळात घालवत असतात. त्यानंतर त्यांच्या उतारवयात त्यांच्या पेन्शनच्याबाबतीत राज्यशासनाने धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. याबाबत या स्पर्धेसाठी ना. शंभुराज देसाई, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री सुदैवाने उपस्थित आहेत. त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा अन त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दि. 9 रोजी येतील त्यावेळी ते बोलतीलच असे ना. रामराजे निंबाळकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या महामारीनंतर शासनाचे निर्बंध शिथील होताच प्रथमच सातारा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. हा सातारा जिल्ह्याचा बहुमान आहे. आज महाराष्ट्र राज्य केसरी विजेते मल्ल जे आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्यशासनाने योग्य ते धोरण तत्काळ ठरवावे, कारण तारुण्यामध्ये संपूर्ण करिअर यामध्ये ते घालत असतात, पण उतारवयात त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, नोकरीत आरक्षण मिळते, पण सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसारख्या योजना आहेत, त्याची आखणी नव्याने करावी, असे प्रतिपादन ना. रामराजे निंबाळकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ यांच्या सहकार्याने 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, साहेबराव पवार, दीपक पवार, सुधीर पवार, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
ना. रामराजे म्हणाले की, सातारा शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष आहे. महाराष्ट्र केसरी जे मल्ल आहेत. तो उमेदीच्या काळात खेळतो पण उतारवयात तेवढा त्याचा सन्मान राहत नाही, त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी राज्य शासनाला आता कुठे तरी निर्णय घ्यावा लागणार आहे, याबाबत या व्यासपीठावर असणारे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आपण लक्ष घालावे. दरम्यान, छ. शाहू स्टेडियम येथे केलेल्या नियोजनामुळे सातारकरांना चांगल्या कुस्ती निश्चितपणे पहायला मिळतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल जे आहेत. ते आपले करिअर यामध्ये घालवत असतात. त्यानंतर त्यांच्या उतारवयात त्यांच्या पेन्शनच्याबाबतीत राज्यशासनाने धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. याबाबत या स्पर्धेसाठी ना. शंभुराज देसाई, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री सुदैवाने उपस्थित आहेत. त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा अन त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दि. 9 रोजी येतील त्यावेळी ते बोलतीलच असे ना. रामराजे निंबाळकर यांनी सांगितले.

शंभूराज देसाई म्हणाले, 1962 नंतर आजचे 64 वे राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती होत आहे, याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मान्यता दिली आहे. हा आपल्या जिल्ह्याचं बहुमान आहे. या स्पर्धेसाठी राज्य शासनाच जे सहकार्य हवं, त्याबाबत महाविकास आघाड करत आहेच. सातार्‍याला कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख आहे. या जिल्ह्याने अनेक महाराष्ट्र कुस्ती दिले आहेत. ऑलम्पिकवर खाशाबा जाधव हे ही याच जिल्ह्यातील. त्यांच्या स्मारकासाठी अलिकडे सर्वांनी प्रयत्न केले. सातारा तालीम संघासाठी इमारत ही त्यावेळी बाळासाहेब देसाई यांनी बांधून दिली. जिल्ह्यात चांगलं काम व्हावं, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. साहेबराव पवार यांचे तालीम संघावर बारकाईने लक्ष राहिले आहे. या तालीम संघाचा नावलौकिक सर्व मिळून वाढवूया. आजच्या या स्पर्धेसाठी क्रीडा संकुल भाडे अन या संयोजनासाठी जो खर्च असेल त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. तालीम संघात जसं कोल्हापूरच नाव आहे, तसे सातार्‍याचे नावलौकिक महाराष्ट्रात राहण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, बर्‍याच वर्षांनी कुस्ती स्पर्धा होत आहेत. सातत्याने तालीम संघाची मागणी होती अन विशेषत: शरद पवार यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार या स्पर्धा होत आहेत की आज जिल्ह्याला अभिमान आहे. इथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा होत आहेत. ही मोठी स्पर्धा आहे. ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दीपक पवार अन् त्यांचे सहकारी परीश्रम घेत आहेत. आज या स्पर्धेचा शुभारंभ झाला उद्या सकाळी अन सायंकाळी या दोन सत्रात स्पर्धा होतील त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

प्रारंभी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत साहेबराव पवार यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव सुधीर पवार यांनी केले. ते म्हणाले की, कुस्तीला राजाश्रय देणारे रामराजे आहेत. सातारा शहराला कुस्तीची परंपरा आहे, ती आम्ही चालवत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. दरम्यान, ना. एकनाथ शिंदे यांच्यावतीने महाराष्ट्रातील कुस्तीपट्टू बांधवासाठी प्रथम उपचारपेटीही देण्यात आली. त्याबद्दल त्यांचे आभार मानणण्यात आले. साहेबराव पवार म्हणाले, महाराष्ट्रील कुस्ती तालीम संघ लयाला का गेली? याबाबत ना. रामराजे यांनी उहापोह केलाय. मी तालीम संघासाठी 10 गुंठे जागा बाळासाहेब देसाई यांना मागितली पण त्याहून अधिक जागा सातारा तालीम संघास देण्यात आली. आज वयाच्या 97 व्या वर्षीही मी तालमीत जात आहे. कारण संस्था टिकली पाहिजे. ज्यावेळी तालमी उभ्या राहिल्या त्यावेळी त्या माध्यमातून अनेक पोलीस, अधिकारी होऊन गेले आहेत. याचा निश्चितच जिल्ह्याला अभिमान आहे. साहेबराव पवार पुढे म्हणाले की, या तालमीतून पैलवान घरी गेल्यानंतर काय होते ते आपण सर्वांनी पाहिले आहे. ज्याची देशात हत्ती, घोड्यावरून मिरवणूक काढली जाते, त्या पैलवनाची उतारवयातील अवस्था ही बिकट राहिली आहे, त्याला उतारवयातही सन्मान देण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे तितकेच गरजेचे आहे. सातारा येथील तालीम संघाला 60 ते 70 वर्षानंतर एक साधा कोच दिला नाही, हे दुर्दैव आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. आभार बाळासाहेब लांडगे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!