राजमाता अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळ्यास यांनीच विरोध केला : दादासाहेब चोरमले


दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2023 | फलटण | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीस नगर परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सदर पुतळा उभारणी बाबत ठराव मांडून पुतळा स्वतः देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेविका सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांनी मांडला, मात्र विरोधी पक्षाने उपसूचना मांडून सदर प्रक्रिया थांबविण्याचे काम केल्याचे कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.

वास्तविक प्रचलित नियम निकष पाहता नगर परिषद महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ शकत नसल्याचे माहित असूनही उपसुचनेद्वारे विरोध करुन नगर परिषदेने सदर पुतळा उभारण्याची उपसूचना मांडून पुण्यश्लोक राजमाता यांच्या पुतळ्यास यांनीच विरोध केल्याचे दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!