दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | सांगोला |
घरच्या पार्श्वभूमीचा कोणताही राजकीय संबंध नाही. घरची परिस्थिती तशी बेताचीच; परंतु दिलेले काम नि:स्वार्थीपणे व मन लावून केले तर त्याचे फळ निश्चितच भेटते, हे सिद्ध करून दाखवले आहे सांगोल्याचे रहिवासी असलेल्या व सोलापूर जिल्हा भाजपचे कार्यालयीन प्रमुख सिद्धेश्वर गाडे या तरुणाने. सिद्धेश्वर गाडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत करण्याची संधी मिळाली. भाजपच्या पक्षीय प्रामाणिक कामकाजामुळेच पंतप्रधानांच्या स्वागताची संधी मिळाल्याचे सिद्धेश्वर गाडी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता विमानतळावर त्यांचे स्वागत करण्याची संधी खिलारवाडी (ता. सांगोला) येथील रहिवासी असलेले सिद्धेश्वर गाडे यांना मिळाली. सिद्धेश्वर गाडे हे तसे उच्चशिक्षीत असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. पक्षीय काम करीत असताना त्यांना भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे कार्यालयीन प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली. या पदावर काम करीत संधीची सोने करून आपली कार्यकुशलता त्यांनी सिद्ध केली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यालयाचा कारभार त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे करीत आहेत. पक्षाच्या विविध योजना, वरिष्ठांमार्फत आलेले प्रत्येक काम, प्रत्येक कार्यक्रम, नियोजनपूर्वक व सर्वसमावेशक केला आहे. जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांसह राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर चांगले संबंध ठेवले आहेत. या संबंधाचाच फायदा त्यांना होत आहे.
सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमासाठी आले असता विमानतळावर त्यांचे स्वागत करण्याची संधी गाडे यांना मिळाली. तसे पाहिले असता सिद्धेश्वर गाडे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. सामान्य कुटुंबातील असलेले गाडे हे सध्या फक्त आपल्या कार्यावर, प्रामाणिकपणा बरोबरच जिद्दीवर सर्वांशी लाडके व्यक्तिमत्व बनले आहे. या त्यांच्या स्वभाव गुणामुळेच त्यांना पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. पंतप्रधानाचे स्वागत करणे माझ्या जीवनातील अतुलनीय क्षण असून हा क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नसल्याचे सिद्धेश्वर गाडे यांनी सांगितले.
माझ्या जीवनातील अनमोल क्षण अनुभवण्यास मिळाला
मी संघटनात्मक काम करीत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व दुसरे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, सरचिटणीस शशिकांत चव्हाण या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांनी मला विमानतळावर स्वागत करण्याची संधी दिली. हा क्षण माझ्या जीवनातील अनमोल असून पंतप्रधानाचे स्वागत करणे मी माझे भाग्य समजतो
– सिद्धेश्वर गाडे, सोलापूर जिल्हा कार्यालयीन प्रमुख, भाजप