व्यसनाच्या आहारी न जाता आरोग्य सांभाळणे गरजेचे : डॉ. जे. टी. पोळ


दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | आपले ऊत्तम आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे. सर्वानी आपल्या आरोग्या कडे वेळो वेळी लक्ष दिले पाहीजे. तंबाखु तसेच ईतर व्यसनाच्या आहारी न जाता आपण आरोग्य संभाळले पाहीजे; असे प्रतिपादन प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांनी केले.

निकोप हाॅस्पीटल व फलटण एसटी आगाराच्या संयुक्त विद्यमाने फलटण आगारातील कर्मचारी व प्रवाशी यांचे करिता आयोजीत करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीरात ते बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक सुखदेव अहिवळे, डॉ. राजश्री मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात रक्तदाब, शुगर व ईतर आजारा बद्दल तपासणी करुन आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. डॉ. राजश्री मेथा, देवकाते, रणपिसे यांनी रुग्ण तपासणी केली.

यावेळी बहुसंख्य एस. टी. कर्मचारी व प्रवाशी बंधु तसेच स्थानकावरील फेरीवाले यांनी शिबिराचा लाभ घेऊन धन्यवाद दिले. सुरुवातीला डॉ. जे. टी. पोळ, डॉ. मेथा व सहकारी याचा एस. टी., प्रशासना तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक श्रीपाल जैन यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!