दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | येथील साखरवाडी येथे असणाऱ्या कै. आर. बी. भोसले यांच्या स्मरणार्थ साखरवाडी विठ्ठल मंदिर पिंपळवाडी येथे मोफत शस्त्रक्रिया व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्ट व कै. शेवंताबाई पवार वाचनालय व ग्रंथालय यांचे विद्यमाने व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, महमदवाडी, पुणे यांचे सहकार्याने संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
शिबिरासाठी डॉ. शरद शिंदे व त्यांचे सहकारी तसेच डॉ. अनिकेत उघडे – पाटील वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच यश मल्टीस्टेट हॉस्पिटलचे डॉ. राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात १५० लोकांची डोळयांची तपासणी करण्यात आली. ४३ लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मोफत निवड करण्यात आली. अल्पदरात ५२ चषम्यांचे अल्पदरात वाटप करण्याचे निच्छित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे संयोजक व महानंदा डेअरी मुंबईचे माजी व्हाइस चेअरमन डी. के. पवार होते.