इस्त्राईल कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी यांनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | इस्त्राईलचे कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी यांनी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उपवाणिज्यदूत दालिया नुईमन, विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर, सांस्कृतिक अधिकारी तोर्शा सेन उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत इस्त्राईल बरोबर काही सामंजस्य करार करण्यास उत्सुकता दर्शविण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या काळात इस्त्राईल  येथील वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम कशा पध्दतीने राबविण्यात येतात, तसेच या अभ्यासक्रमाचा फायदा महाराष्ट्रात कसा होऊ शकेल याबाबत अभ्यास करण्यात येईल.

इस्त्राईल  देशातील परंपरा, संस्कृती आणि इतिहास जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काही सांस्कृतिक महोत्सव कशा पद्धतीने आयोजित करता येतील याबाबतसुध्दा या भेटीदरम्यान चर्चा झाली. या महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि इस्त्राईल  देशामधील आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक देवाण घेवाण अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!