फलटणमध्ये मराठा समाजाकडून ओबीसी नेत्यांना धमकवण्याचे काम : समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 3 डिसेंबर 2023 | फलटण | फलटणला एक आगळी वेगळी अशी परंपरा आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यातील ओबीसी समाजातील अनेकांना धमकवण्याचे काम सुरू आहे. तरी आता ह्यापुढे जर अश्या घटना झाल्या तर आम्हाला सुद्धा वेगळा पर्याय निवडावा लागेल; असे मत समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे व्यक्त केले.

फलटण येथील श्री संत सावता मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापूराव शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव, शरद कोल्हे, अंबादास दळवी, अमीर शेख, रणजित भुजबळ, विकास शिंदे, गोविंद भुजबळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; मराठा समाजाचे जे मोर्चे चालू आहेत त्यामध्ये जी टीका ना. छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे; त्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. आगामी काळामध्ये जर ना. भुजबळ यांच्यावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही.

दि. 9 डिसेंबर रोजी इंदापूर येथे जो ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला जाण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन जाण्याची तयारी करावी. सर्व घटकांना एकत्र येऊन आम्ही लढा लढत आहोत; असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले.

आता ओबीसीमध्ये अनेक जाती व धर्म आहेत. यामध्ये आताच्या घडीला अनेक समस्या आहेत; त्याला सर्व जण एकत्रित सामोरे जावे लागत आहे. ओबीसी मधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. आता महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे; अशी मागणी जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांनी केली.

दि. 9 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी समाजाचा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला फलटण तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांनी जाण्यासाठी सज्ज राहावे; असे आवाहन अंबादास दळवी यांनी यावेळी केले.

विकास शिंदे यांनी फलटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत केले तर विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!