‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर ठाकूर यांची मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर ठाकूर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार, दि. 2, गुरुवार, दि. 3 व शुक्रवार, दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासनाचा संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार त्यांना अलिकडेच घोषित करण्यात आला असून 65 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार आणि पार्श्व संगीतकार म्हणून रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाचा पट या मुलाखतीतून उलगडण्यात आला आहे.

मराठी रंगभूमीची 170 वर्षांपेक्षा अधिक काळ चालत आलेली समृद्ध परंपरा, त्यात वेळावेळी झालेले बदल, विविध नाटकांची वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य रचना, प्रकाश योजना, तसेच राज्य नाट्य स्पर्धेचे योगदान इ. बाबत रंजक माहिती या मुलाखतीतून श्री.ठाकूर यांनी दिली आहे. ज्येष्ठ निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!