दिलखुलास कार्यक्रमात उद्या कर्जतचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांची मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । मुंबई । अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या वतीने राज्यात प्रथमच महाडीबीटी मेळावा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महाडीबीटी कृषिमेळावा आयोजित करण्याची संकल्पना मांडणारे कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2022-2023 अंतर्गत शासकीय कर्मचारी गटातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती जाणून घेणार आहोत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 13 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!