‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०९ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 9 नोव्हेंबर 2022, गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे महत्त्व, या मंडळाचे रोजगार निर्मितीतील योगदान, केंद्र आणि राज्य शासनाच्या  योजना व उपक्रम, मधाचे गाव संकल्पना, मध व इतर उत्पादनासाठी बाजारपेठ, मध केंद्र योजना अशा विविध विषयावर विस्तृत माहिती श्री. जगताप यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Back to top button
Don`t copy text!