स्थैर्य, खंडाळा, दि १३: विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये जावुन अबालवृध्द , महिला यांना एटीएमचे व्यवहार करण्यात मदतीचा बहाणा करीत त्यांची हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करीत तसेच रुमालामध्ये कागदाचा नोटांच्या आकाराचा बंडल बनवित कमिशनचे आमिष दाखवुन रोख स्वरुपात रक्कम घेवुन गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स शिरवळ पोलिसांनी फर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्यासह चार जणांच्या मुसक्या आनेवाडी टोलनाक्यावर पोलीसांना आवळल्या.
संबंधित टोळीकडुन टोळीकडून महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , गुजरात , मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस येवुन ६२ विविध राष्ट्रीयकृत बँका व को ऑपरेटीव्ह बँकांचे एटीएम कार्ड , कारसह ३लाख 8 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरवळ ता . खंडाळा येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे निलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये रक्कम काढण्यासाठी मित्रासमवेत गेले होते . यावेळी त्यांच्या मागे असलेल्या अज्ञात दोघांनी ते करत असलेले व्यवहार पाहत व एटीएम मधुन पैसे न निघाल्यामुळे पावती पाहत असतानाच निलेश सुर्वे यांचे एटीएम कार्ड एटीएम मशीन मधुन हातचलाखीने बदलत त्याच बँकेचे त्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड सुर्वे यांच्या हातात दिले . यावेळी निलेश सुर्वे यांच्या गोबाईलवर त्यांचे खात्यातील रक्कम शिरवळ येथील बँकेचे एटीएम सेंटरमधुन तसेच वेळे व आसले ता . वाई येथील पेट्रोलपंपावरुन अचानकपणे पन्नास हजार आठशे दहा रुपये वजा झाल्याचे संदेश प्राप्त झाल्याने निलेश सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशन गाठत अनोळखी इसमांविरुध्द फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल केला ल. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन व यापुर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या जुन्या सीसीटीव्हीचे व मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक गुन्हयाचे अवलोकन करीत तानाजी बरडे सोा , उपविभागीय पोलीस अधिकारी , फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश हजारे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे , पोलीस अमंलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वप्निल दौंड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्हीचे पाहणी करत गुन्हेगारांच्या चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करीत सदरील गुन्हा हा उल्हासनगर ठाणे येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे निदर्शनास आले . त्यानुसार संबंधित सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली असता गुन्हेगार हे गोवा राज्यात गेल्याचे दिसुन आले.
त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक सागर अरगडे , पोलीस अंमलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वनिल दौड यांच्या पथकाने संबंधितांची गोवा राज्यापासुन हालचालींचा मागोवा घेतला असता शिरवळ पोलीसांनी आरोपीचा मागोवा घेत शेंद्रे फाटा पासुन शिरवळ : पोलीस स्टेशन कडील कर्मचारी यांनी सराईत सराईत गुन्हेगार हे गोवा राज्यातुन परत उल्हासनगर ठाणे याठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार थाटे फाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून थरारक पाठलाग करत संशयितांना जेरबंद करण्यात आले.
प्रदीप साहेबराव पाटील वय २ ९ वर्षे, विकी राजु वानखेडे वय २१ वर्षे , किरण कचरु कोकणे वय ३५ वर्षे , महेश पांडुरंग धनगर वय ३१ वर्षे सर्व रा . म्हारळगांव , उल्हासनगर ठाणे अशी संशयितांची नावे आहेत.
या टोळीकडून शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील ३ गुन्हे, पडघा ( ठाणे ग्रामीण ) , अहमदनगर येथील राहुरी , सांगोला जि.सोलापुर पिपरी चिचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हदीमधील असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.