केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । नाशिक । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्र्यंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी आयोजित बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुंबईचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, वासंती माळी, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अर्चना पठारे, संदिप आहेर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमांचे एकाच वेळी थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमास्थळी संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेवून त्या दृष्टिने योग्य त्या उपाययोजना करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. तसेच केंद्रीय राजशिष्टाचारानुसार सर्व बाबींचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडीत वीज पुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!