माहिम किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । मुंबईतील माहिम किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ला परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन नूतनीकरणानंतर या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी सांगितले. यामुळे पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माहिम किल्ला नूतनीकरण आणि सुशोभीकरणासंदर्भात श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, पुरातत्व संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

माहिम किल्ला परिसरात अनेक वर्षांपासून रहात असलेल्या नागरिकांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यानंतर जून अखेरपर्यंत हा परिसर रिकामा करून पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने या परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करून किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले. किल्ला आणि परिसराची पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाचे काम करताना किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावे तसेच किल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी नाविण्यपूर्ण कल्पना राबवाव्यात असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!