दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२४ | फलटण |
दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२४ चे दिले जाणारे राज्यस्तरीय क्रीडारत्न, कलारत्न, आरोग्यरत्न, कृषीरत्न, साहित्यरत्न, प्रशासनरत्न, शिक्षणरत्न व उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.
या पुरस्कारांमध्ये सोलापूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कु. श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांना क्रीडारत्न, कांबळेश्वर (ता. बारामती, जि. पुणे) येथील चांडाळ चौकटीच्या करामती फेम ‘गणा पैलवान’ वेब सिरीजचे निर्माते तुषार महादेव घोरपडे उर्फ ‘गणा पैलवान’ यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’, फलटण येथील मनोविकार तज्ज्ञ, उत्कृष्ट समुपदेशक सौ. राजश्री किरणकुमार नाळे यांना ‘राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार’, ‘कै. पांडुरंग कोंडीबा सोनवलकर राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार’ आसू, ता.फलटण येथील प्रगतशील शेतकरी कृष्णाथ लक्ष्मण फुले यांना, साहित्यिक ‘कै. विठ्ठल बापूजी ठोंबरे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार’ मारुतराव बापूराव वाघमोडे यांना, सामाजिक वनीकरण विभागात सातारा येथील आदर्श विभागीय वन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हरिश्चंद्र सुभाष वाघमोडे यांना ‘राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच दौंड तालुक्यातील आदर्श शिक्षक युवराज लक्ष्मण घोगरे यांना ‘राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार’, गारळेवाडी (ता. खटाव) येथील मारुती शंकर गारळे यांना ‘राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कारांचे वितरण दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित दुधेबावी फेस्टिवल अंतर्गत कार्यक्रमात केले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष सागर कराडे, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, क्रीडा कमिटीचे अध्यक्ष कांता सोनवलकर त्यांनी स्पष्ट केले.