आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा ।  कु. अनुष्का कुंभार हिने भोपाळ येथे झालेल्या युथ चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत 400 मी. क्रीडा प्रकारात प्राविण्या संपादन करुन तिची कुवेत येथे होणाऱ्या युथ एशियन गेम्सकरिता भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मैदानी क्रीडा स्पर्धेतील ट्रायथलॉन क्रीडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक  संपादन करुन गुवाहटी, आसाम येथे होणात्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेल्या ध्रुव लावंड या दोन्ही खेळाडूंचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी हितेंद्र खरात, आर.वाय. जाधव यांच्यासह दत्तात्रय कुंभार, जाई लावंड उपस्थित होत्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!