वाठार स्टेशन येथील वाग्देव चौक हायवेवर रंबल बसवा, महाराष्ट्र वाहतूक सेना व जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी


स्थैर्य, वाठार स्टेशन, दि. २६: सातारा ते लोणंद हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वाहने भरधाव वेगाने जात असतात वाठार स्टेशन येथे वाग्देव चौक हा धोकादायक ठरू लागल्याने हायवेवर रंबल बसविण्याची मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व जय मल्हार क्रांती संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष भगवान चव्हाण यांच्यावतीने केली जात आहे.

वाठार स्टेशन ही मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण आहे यातच गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने येथे असणाऱ्या वाग्देव चौकाजवळ दोन्हीकडून तीव्र असा उतार आहे त्यामुळे येथे वाहनांच्या भरधाव वेगाने सतत छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत तसेच या हायवेलगत महाविद्यालयही आहे त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गती कमी होणे फार गरजेचे आहे यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व जय मल्हार क्रांती संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष भगवान चव्हाण यांच्यावतीने हायवेवर रंबल बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदनही देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसैनिक व जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!