फलटणमध्ये माळी समाजातील वधू-वरांची माहिती उपलब्ध


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघ, तसेच महामित्र पाक्षिक परिवाराच्या वतीने गेल्या ३२ वर्षापासून माळी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षभर वधू-वरांची नोंदणी केली जाते. इच्छुकांना दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत वधू-वरांची माहिती उपलब्ध करूण दिली जाते. यामाध्यमातून गेल्या ३२ वर्षात पाच हजारांहून अधिक विवाह जुळून आले असून पालक वर्गात मोठा परिचय वाढला आहे.

डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर तसेच इतर क्षेत्रातील अनेक स्थळे मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. ज्यांना माहिती हवी असेल किंवा वधू-वरांची नाव नोंदणी करावयाची असेल तर त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा किंवा आपल्या वधू-वरांची माहिती पाठवावी, असे आवाहन दशरथ फुले (संपादक – महामित्र, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फलटण, जि. सातारा, मो. ९८२३२७२५२३) यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!