दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
कोलकाता येथील महिला डॉक्टरचा रेप करून हत्या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध फलटण येथील इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी मेडिकल असोसिएशनने निवेदनाद्वारे प्रशासनास केली आहे.
निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टरवर झालेल्या क्रूर गुन्हेगारीचा आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर गुंडगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन फलटण शाखा या क्रूर घटनांचा तीव्र निषेध करीत आहे व अशा घटना भविष्यात घडुू नये यासाठी नवीन कडक कायदा तयार करावा व सर्व डॉक्टरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे, अशी शासनाकडे आमची मागणी आहे. या घटनेतील पीडित डॉक्टरला योग्य न्याय मिळावा, अशी मागणीही मेडिकल असोसिएशनने केली आहे.