चंद्रभूमीवर पडणार भारतीय पावले; नासाच्या चांद्रमोहिमेसाठी भारतीय वंशाच्या अंतराळवीराची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१२: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या आगामी चांद्रमोहिमेसाठी १८ अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली आहे. यात निम्म्या महिला तसेच राजा जॉन वुरपुट्टुर चारी या भारतीय वंशाच्या अंतराळवीरांचाही समावेश आहे. 

ते या यादीतील एकमेव भारतीय-अमेरिकी आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये २०१४ मध्ये पार पडणाऱ्या आर्टेमिस चांद्रमोहिमेच्या सदस्यांचा नावे जाहीर केली. नासाच्या या मोहिमेद्वारे जगातील पहिली महिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे. 

चारी अमेरिकेच्या हवाई दल अकादमीचे तसेच नेव्हल टेस्ट पायलट स्कूलचे ते पदवीधर आहेत. नासाने २०१७ मध्येच अंतराळवीरांसाठीच्या विशेष प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची निवड केली होती. हे सुरवातीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता ते चांद्रमोहिमेसाठी पात्र ठरले आहेत. या अंतराळवीरांमध्ये गेल्या वर्षी स्पेसवॉक करणाऱ्या ख्रिस्तिना कोच आणि जेसिका मेयर या पहिल्या महिलांचाही समावेश आहे. नासा लवकरच या अंतराळवीरांसाठी अंतराळात करण्याची प्रात्यक्षिकेही जाहीर करेल. त्याचप्रमाणे, त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांची नावेही जाहीर केली जातील. अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नासाच्या विज्ञान, संशोधन, अंतराळ मोहिमा व तंत्रज्ञान विकासाला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाईन यांनी आभार मानले आहेत. 

अमेरिकावासियांना मी या अंतराळवीरांच्या रुपाने भविष्याचे नायक दिले आहेत. ते आपल्याला चंद्राची सफर घडवून आणतील. या अंतराळवीरांमध्ये पुरुष अंतराळवीरांबरोबरच चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीराचा समावेश आहे, ही कल्पनाही सुखावून जाते. – माईक पेन्स, उपाध्यक्ष, अमेरिका 

विविध स्तरातील अतराळवीरांचा समावेश 

अमेरिकेच्या या महत्वाकांक्षी चांद्रमोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत. यातील बहुतेक अंतराळवीर ३० ते ४० या वयोगटातील आहेत. सर्वांत तरुण अंतराळवीर ३२ तर सर्वांत ज्येष्ठ अंतराळवीर ५५ वर्षांचा आहे. निम्म्या अंतराळवीरांना स्पेसवॉकचा अनुभव आहे. २०३० पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्तीच्या दृष्टीने नासाची ही मोहिम विशेष महत्त्वाची असेल. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!