भारतीय पोस्ट खात्यामध्ये सातारा जिल्ह्यासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; शेवटचे काही दिवसच शिल्लक; पहा सविस्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2024 | सातारा | टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा ४१५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली नमुद केलेल्या अटींची पूर्तता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी प्रवर अधिक्षक डाकघर सातारा विभाग सातारा ४१५००१ यांच्या कार्यालयास दि. ३१ जुलै 2024 पर्यंत अर्ज पाठवावे. अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावी.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार हा १० वी पास किंवा केंद्र/राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त मंडळाद्वारे आयोजित समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय मर्यादाः उमेदवाराचे किमान आणि कमाल वय अनुक्रमे १८ आणि ५० वर्षे असणे आवश्यक आहे. कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी / माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार / स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार अर्ज पाठवू शकतात.

मुलाखत –

इच्छुक पात्र व्यक्ती दिलेल्या तारखेस व वेळेत आवश्यक प्रमाणपत्रांसह ‘वॉक-इन-इंटरव्ह्यू मध्ये उपस्थित राहतील. मुलाखतीत भारतातील जीवन विमा उद्योगाचे ज्ञान, पीएलआय / आरपीएलआय उत्पादनांचे ज्ञान आणि विमा उत्पादनांच्या विपणनाचे ज्ञान यावरील प्रश्नांचा समावेश असेल, असे प्रवर अधिक्षक डाकघर सातारा विभाग, सातारा यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!