टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नागपूर, दि. ०९: कोरोना बाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनासोबतच टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज राज्य शासनाकडे केली.  आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यावेळी उपस्थित होते. एका खासगी कंपनीने ऑक्सिजन प्लाँट उभारण्याबाबत सादरीकरण केले. यावेळी  जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या होत असला तरी अधिकच्या तरतूदीसाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, असेही त्यांनी आदेश दिले.

संपूर्ण राज्यासाठी 800 टॉसिलीझुमॅब इंजेक्शन केंद्राकडून येतात. बाधितांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. गेल्या 5 मे रोजी 105 व त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी टॉसिलीझुमॅब इंजेक्शन ‍जिल्ह्याला प्राप्त झाले होते. या इंजेक्शनसाठी वाढीव मागणी सीपला कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!