राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी इंद्रजित गुंजवटेची निवड; फलटणमध्ये अभिनंदनाचा वर्षाव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यस्तरीय शालेय १७ वर्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी फलटणच्या इंद्रजित गुंजवटेची निवड झाली असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑक्टोबर : सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या कोल्हापूर विभागस्तरीय क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत फलटण येथील मुधोजी हायस्कूलचा विद्यार्थी इंद्रजित गुंजवटे याने घवघवीत यश मिळवले आहे. त्याची राज्यस्तरीय शालेय १७ वर्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जळगाव येथे रंगणार राज्यस्तरीय स्पर्धा

ही राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जळगाव येथे १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून पात्र ठरलेल्या इंद्रजितच्या निवडीने फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

इंद्रजित हा माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांचा नातू आहे. त्याच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!