फलटण शहर व परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ; नागरिकांनी जागरुक राहण्याचे पोलिसांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सन २०२३ मध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२ घरफोडी-चोरीचे गुन्हे घडले होते. त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आले होते. गतवर्षाची तुलना करता सन २०२४ मध्ये घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी अलीकडील कालावधीत अशा घरफोडींच्या गुन्ह्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांनी जागरुक राहून दक्षता घेण्याचे आवाहन फलटण पोलिसांनी पत्रकाद्वारे केले आहे.

दि.२६/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता ते दि. २७/०९/२०२४ रोजी स.८.०० वा. च्या दरम्यान मालोजीनगर, कोळकी (ता. फलटण) येथील श्री. सोनाजी अश्रुबा घोळवे (वय ३२) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करत घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा असा एकूण ४१,५००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

सन २०२४ मध्ये महिनानिहाय जानेवारीमध्ये १, फेब्रुवारीमध्ये १, मार्चमध्ये ०, एप्रिलमध्ये ३, मेमध्ये १, जूनमध्ये २, जुलैमध्ये ३, ऑगस्टमध्ये ० आणि सप्टेंबरमध्ये ३ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी माहे एप्रिलमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एक गुन्हा उघडकीस आला असून त्यामध्ये आरोपी स्वप्नील उर्फ काळु सुरेश जाधव आणि निखील उर्फ बाळू सुरेश जाधव, दोघे रा. तावडी, ता. फलटण यांना अटक केली होती.

माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये आजपर्यंत तीन गुन्हे घडले असून, यापैकी कोळकी येथील दहिवडी चौक ते कोळकी रोड येथील पत्र्याच्या मोठ्या दुकानातून हार्डवेअरचे एकूण रु.१३,७१,८१६/- किंमतीचे साहित्य चोरीस गेले आहे.

घरफोडी-चोरीमध्ये बंद घरात घरफोडी चोरीचे प्रमाण जास्त आहे. याअनुषंगाने सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे मूलभूत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  1. घरातून बाहेर जाताना कुलूप लावून जावे. आपण घरी नसल्याबाबत शेजारील विश्वासू व्यक्तींना सांगावे.
  2. अपार्टमेंट असलेल्या ठिकाणी वॉचमन ठेवावेत. सीसीटीव्ही लावावेत. याचे डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी दुसरीकडे ठेवावेत. जेणेकरुन
  3. डीव्हीआर चोरीस जाणार नाहीत.
  4. घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.
  5. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरी ठेवू नये.
  6. कोणासही संशयास्द हालचाली दिसल्यास ११२ क्रमांकावर माहिती द्यावी.

Back to top button
Don`t copy text!