दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विवेक वाहिनी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक वाहिनीचे उद्घाटन आणि ‘एन एस एस डे’ निमित्त ‘विवेक जागर’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी डॉ. प्रकाश दिगंबर सावंत, कॉमर्स विभाग प्रमुख, टि के टोपे आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज मुंबई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी विवेक वाहिनी, एन एस एस सारखे उपक्रम महाविद्यालयातील युवकांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि जडणघडणीसाठी विशेष उपयुक्त ठरतात, असे सांगून पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.
आजही लोक अंधश्रद्धा रुढीपरंपरांमध्येच जखडले गेले आहेत केवळ तंत्रज्ञान वापरून कोणी विवेकी होत नसतो. त्यासाठी विज्ञानाबरोबर येणारी वैज्ञानिक दृष्टी सुद्धा आवश्यक असते, असे सांगून विवेक वाहिनीचे उद्घाटन केले. त्यांच्या सोबत आलेल्या चंद्रकांत सर्वगोड, साबळे आणि पत्रकार कु. प्रीती कुटे या ठाणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत माहिती दिली.