
दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचलीत जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर येथे ‘जनसेवा वाचनालय’ या नावाच्या सुसज्ज वाचनालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे.
हे जनसेवा वाचनालय, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, स्वरा हाईटस्, दुसरा मजला, डी.एड्. चौक, रिंगरोड, फलटण येथे आहे.
उद्घाटन समारंभ सुप्रसिध्द लेखक आणि वक्ते मनोज अंबिके यांच्या हस्ते आणि सुप्रसिध्द कवियत्री, सांगलीच्या वाचकप्रेमी वाचनालयाच्या संस्थापक संचालिका सौ. विजय हिरेमठ, मुंबई माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. एच. स. शिंगण, फलटण अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष अरुण भोईटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने फलटणकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मॅग फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंता मोहोटकर, माऊली फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अॅड. विश्वनाथ टाळकुटे व अनुबंध कला मंडळाचे उपाध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले आहे.