दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२४ | फलटण |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न होत आहे. हे कार्यालय शिंगणापूर रोड, जुने मुलींचे वसतीगृह, शिवाजीनगर, फलटण येथे झाले आहे.
या उद्घाटन समारंभास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास मंहामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. जयंत आसगावकर, आ. अरुण लाड, आ. महादेव जानकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या विशेष उपस्थिती होणार आहे.
या समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सातारचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.