दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी सुमारे १५.४५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून शहरातील ही विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून सदरील निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
फलटण नगर परिषद हद्दीतील मंजूर विकासकामे खालीलप्रमाणे –
गत तीस वर्षांपासून बंद असलेली विकास गंगा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू झालेली आहे. आगामी काळामध्ये फलटण शहरासह फलटण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कटिबद्ध आहेत, असेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.