जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम यांचा शनिवारी नवलबाई मंगल कार्यालयात पदग्रहण समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम यांचा सन २०२३ ते २०२५ चा पदग्रहण समारंभ शनिवार, दि.२९ एप्रिल रोजी नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.

यावेळी जैन सोशल ग्रुपच्या नूतन अध्यक्षा म्हणून सविता दोशी, सचिव म्हणून प्रीतम शहा, खजिनदार म्हणून समीर शहा शपथ घेतील. संगिनी फोरमच्या नूतन अध्यक्षा म्हणून अपर्णा जैन, सचिव म्हणून प्रज्ञा दोशी, खजिनदार म्हणून मनिषा घडिया यावेळी शपथ घेतील. तसेच युवा फोरमचे नूतन अध्यक्ष म्हणून तेजस रविंद्र शहा, सचिव म्हणून पुनित दोशी, खजिनदार म्हणून मीहिर गांधी शपथ घेतील.

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनचे प्रेसिडेंट उन्मेशभाई कर्नावट कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.रिजनचे व्हाईस चेअरमन सचिन दोशी नूतन पदाधिकारी यांना शपथ देतील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी रिजन प्रेसिडेंट राजेंद्र धोका, ज्येष्ट पत्रकार अरविंदभाई मेहता, रिजन पि.आर.ओ. सुनितभई परिख, संगिनी चेअरपर्सन सुवर्णाबेन सिसोदिया, कोल्हापूर झोन को-ऑर्डिनेटर रज्जूबेन कटारिया, माजी रिजन प्रेसीडेंट मांगिलाल कोठारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!