इंजिनिअरिंग युनिव्हर्स पॅरामेडिकल अ‍ॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा ७ जून रोजी उद्घाटन सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ जून २०२३ | फलटण |
फलटण येथे ज्ञानज्योती फौंडेशन संचलीत इंजिनिअरिंग युनिव्हर्स पॅरामेडिकल अ‍ॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. ७ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. हा सोहळा दुसरा मजला, वरद प्लाझा, बारामती सहकारी बँकेच्या वरती, नारळीबाग, फलटण येथे संपन्न होणार आहे.

यावेळी स्मार्ट एज्युकेशन अ‍ॅकॅडमी कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजित केळकर (सर), श्रीकृष्ण एज्युकेशन इन्स्टिट्यूट माळशिरसचे संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक वाघमोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच विडणीचे सरपंच सागर अभंग, उपसरपंच अ‍ॅड. सुनील अब्दागिरे, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विडणी विकास सोसायटीचे चेअरमन मारूती नाळे, प.पू. राजनकाका देशमुख, विडणीच्या पोलीस पाटील सौ. शीतल नेरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!