दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
आळजापूर, ता. फलटण गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन समारंभ व जाहीर सभेचे आयोजन रविवार, दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित केला आहे. हा समारंभ विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दीपक चव्हाण भूषविणार आहेत.
या समारंभास कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती फलटणचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, माजी जि. प. सदस्य धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सातारा सौ. प्रतिभाताई धुमाळ, श्री भैरवनाथ उद्योग समूह आदर्की बुद्रुकचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कासार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक श्री. विश्वासराव निंबाळकर, जानोजीराव मालोजीराव भोईटे पतसंस्था हिंगणगावचे चेअरमन श्री. पराग भोईटे-इनामदार, माजी सरपंच ग्रामपंचायत कापशी श्री. रविंद्र कदम, पोलीस पाटील श्री. नितीन जाधव, सरपंच ग्रामपंचायत आदर्की बु. श्री. गणपतराव धुमाळ, सरपंच ग्रामपंचायत, सासवड श्री. राजेंद्र काकडे (सर), सरपंच ग्रामपंचायत, आदर्की खु. सौ. निलम सौरभ निंबाळकर, उपसरपंच ग्रामपंचायत बिबी श्री. सचिन बोबडे तसेच माजी जि. प. सदस्य श्री. सुभाषराव धुमाळ, माजी सरपंच ग्रामपंचायत आदर्की खु. श्री. दिवाकर निंबाळकर, , श्रीराम साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. डॉ. पद्मराज भोईटे, माजी सरपंच ग्रामपंचायत कापशी श्री. दिपक कदम, माजी सरपंच ग्रामपंचायत बिबी श्री. नवनाथ बोबडे, सरपंच ग्रामपंचायत टाकुबाईचीवाडी श्री. कुणाल झणझणे, सरपंच ग्रामपंचाय बिबी सौ. रुपाली महिपत बोबडे, सरपंच ग्रामपंचायत कापशी सौ. पूनम सुशांत राशिंकर, उपसरपंच ग्रामपंचायत आदर्की बु. श्री. युनूस पठाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास आळजापूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे गट पश्चिम भाग व समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत आळजापूर यांनी केले आहे.
भूमिपूजन समारंभ :
पूर्ण झालेली कामे व निधी
१. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप – १० लक्ष
२. आळजापूर ते पावरवस्ती, मसुगडेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे – १० लक्ष
३. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुशोभीकरण करणे – १५ लक्ष
४. आळजापूर केंजळे वस्तीकडे जाणार्या ओढ्यावर साकव पुल बांधणे – ४८ लक्ष
५. आळजापूर गावाअंतर्गत कॅन्क्रेट रस्ते करणे – २० लक्ष
६. आळजापूर मागासवर्गीय वस्ती येथे समाजमंदिर बांधणे – ७ लक्ष
७. आळजापूर स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॅन्क्रेट करणे – ५ लक्ष
मंजूर झालेली कामे :
१. आळजापूर वितरिका नं. ३७ – २१ कोटी
२. आळजापूर ग्रामपंचायत कार्यालया समोर पेव्हर ब्लॉक बसविणे – ७ लक्ष
३. आळजापूर श्री भैरवनाथ मंदीरा कडे जाणारा रस्ता करणे – १० लक्ष
४. आळजापूर धुमाळाचे पठार येथे रस्ता करणे – १० लक्ष
५. आळजापूर पवार वस्ती येथे ओढ्यात बंधारा बांधने – १८ लक्ष
जाहीर सभा :
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
स्थळ :
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आळजापूर