
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा , दि. १६: वावदरे, ता. सातारा येथे गाईच्या धक्क्याने गाडी पडल्याच्या कारणावरून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी, वावदरे येथील मराठी शाळेच्या कट्ट्यसमोर गाईचा धक्का लागून गाडी खाली पडली. याचा राग मनात धरून दत्तात्रय संपत जगताप, रा. वावदरे, ता. सातारा याने आदित्य गुलाब जगताप वय 20 यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच नजिक पडलेल्या दांडक्याने डोक्यात व पाठीवर हातावर मारहाण केली. यात आदित्य जगताप जखमी झाले आहेत. याप्रकरणी अदित्य जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय संपत जगताप याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार बर्गे करत आहेत.
