दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व . रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर .डी .पाटील यांची जयंती सोमवार दिनांक ०१/०८/२०२२ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील म्हणाले, सातारा जिल्हयाचे सर्वांगीण विकासासाठी, जिल्हयातील प्रत्येक तळागाळातील
घटकांचा, सहकारी संस्थांचा, सहकार चळवळीचा तसेच औद्योगिक प्रगती होणेसाठी तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
स्थापनेत आर .डी .पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. या बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, बाळासाहेब
देसाई, आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. जिल्ह्यातील कल्याणकारी योजनांच्या उन्नतीसाठी आर .डी .पाटील यांनी निर्णायक सहाय्य केले. त्यांनी केलेल्या निष्काम सेवेबद्दल सबंध सातारा जिल्हा ऋणी आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, स्व.रघुनाथराव पाटील यांचे सातारा जिल्हा बॅंकेच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यांचे कार्य सहकार क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या सर्वांना प्रेरणादायी असून सहकारी बॅंकिग क्षेत्रात त्यांचे काम दीपस्तंभा सारखे आहे. स्व. रघुनाथराव पाटील यांचे व्यक्तीमत्व निस्वार्थी आणि निष्कलंक होते. सन १९४७-४८ मध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे सतत १७ वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ लि. पुणेचे अध्यक्ष, कोयना सह. दूध प्रकल्पांचे अध्यक्षपद अशी
रघुनाथराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे. या प्रसंगी बँकेचे संचालक श्री. प्रभाकर घार्गे, श्री. राजेंद्र राजपुरे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनी स्व .रघुनाथराव दौलतराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले .