फलटण शहरात ‘लव जिहाद’मधून महिलेवर अत्याचार, फसवणूक?

फलटण शहर पोलिसात तक्रार दाखल


दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२४ | फलटण |
दत्तनगर, फलटण येथे राहणार्‍या एका महिलेची ‘लव जिहाद’मधून फसवणूक झाल्याची व तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजते. आपली फसवणूक झाल्याची तक्रार या महिलेने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, पतीबरोबर वाद झाल्यानंतर ही महिला आपल्या एका मुलासह फलटण शहरात राहण्यास आले होते. त्यावेळी नोकरीसाठी कॉम्प्युटर क्लास सुरू केल्यानंतर तेथे मुस्लीम समाजातील एका व्यक्तीबरोबर तिची ओळख झाली. त्यावेळी त्या व्यक्तीने या महिलेस नोकरी लावतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर या महिलेचे व त्या युवकाचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या युवकाने या महिलेस लग्नाचे तसेच नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यातून या युवकाने फिर्यादी महिलेवर वारंवार अत्याचार केले. काही दिवसांनी या महिलेने त्या युवकाला लग्न करूया, असे म्हटल्यानंतर त्या युवकाने नकार दिला. त्यानंतर या यवुकाने त्याचे लग्न झाले असून मला एक मुलगी आहे व माझी पत्नी व मुलगी ह्या माहेरी राहत आहेत, माझे तिच्याशी पटत नाही, असे म्हणून शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर महिलेने लग्न कधी करणार आहे, असे विचारलेवर कोर्टातील केस संपल्यावर आपण लग्न करू, असे त्याने सांगितले. त्यानंतर महिला नोकरीला लागल्यानंतर तिच्यावर हा युवक संशय घेवून शिवीगाळ करत होता. त्यानंतर तो युवक मारहाण करून महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत असे.

दिनांक १५ मार्च २०२४ रोजी या युवकाने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेबरोबर दोघांचा व्हिडिओ बनवून त्यामध्ये ही माझी बायको आहे, असे सांगितले. त्यानंतर तू जर माझी पोलीस तक्रार केलीस किंवा मला सोडून गेलीस तर मी तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार आहे, अशी धमकी दिली.

डिसेंबर २०२२ पासून ते दिनांक १८ मे २०२४ रोजी रात्री ८.३० वा. पर्यत वेळोवेळी दत्तनगर, फलटण येथे मला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी माझेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मी त्याला तु माझेशी लग्न कधी करणार आहे, असे विचारलेवर तो मला तुझी कोर्टातील केस संपल्यावर आपण लग्न करू असे म्हणाला. तसेच मी म्हणेन तसेच तू वागायचे, बुरखा घालायचा, टिकली लावायची नाही, नमाज पाडायचे, हे सर्व तुला करावे लागेल तरच मी तुझ्याशी लग्न करीन. असे म्हणून मी त्याचे नाही ऐकले तर तो मला मारहाण करीत असे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेचा अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!