
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, कोळकी : कोळकी, ता. फलटण येथे राहणाऱ्या कु. सई विराज खराडे हिने इयत्ता दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत 96% गुण मिळवुन यश संपादन केले आहे. कु. सई ही श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, फलटणची अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिने 2015 साली धनुर्विद्या या खेळा मध्ये आसाम येथे 60 नॅशनल स्कूल गेम मध्ये यश संपादन केले होते. तसेच संगीत क्षेत्रात सुद्धा तिने प्राविण्य मिळवले आहे. इयत्ता दहावी मध्ये स्कूलची हेड गर्ल म्हणून तिने उत्तम काम केलेले आहे. तिच्या ह्या अष्टपैलू गुणांमुळे स्कूल कडून ह्या वर्षी दिला जाणारा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड कु. सईला प्राप्त झाला आहे. कु. सईच्या ह्या संपूर्ण यशाबद्दल तिचे शाळेच्या वतीने व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
