फलटणमध्ये ‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेंतर्गत फलटण नगर परिषद क्षेत्रात सोमवार, दि. १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात आलेल्या शासकीय दवाखान्याचे उद्घाटन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन, धन्वंतरी पूजन आणि फीत कापून समारंभपूर्वक करण्यात आले.

यावेळी नोडल ऑफिसर पुणे डॉ. देसाई, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, संतोष सावंत, अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, तुषार नाईक निंबाळकर, बबलू मोमीन, विराज खराडे, डॉ. सुभाष गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. जगदाळे, श्रीमती डॉ. एस. बी. सोनवलकर यांच्यासह आशा वर्कर व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात सुरू होत असलेल्या दवाखान्यांची उद्घाटने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आली. सातारा जिल्ह्यात फलटण, मेढा, कराड, लोणंद, कोरेगाव, पाचगणी, म्हसवड, पाटण, सातारा आणि वाई या १० ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.

या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी राहणार असून मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, गर्भवती माता तपासणी, लसीकरण आणि मोफत वैद्यकीय सल्ला उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय महिन्यातून एक दिवस नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सुविधा, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकते नुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!