फलटण बाजार समितीत सत्ताधारी गटाला छत्री तर विरोधी गटाची कपबशी चिन्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२३ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्याना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. या निवडणुकीत चार उमेदवार बिनविरोध करून राजे गट तथा राष्ट्रवादी काँग्रेसने आपली विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तर शिवसेना, रासप व काँग्रेसच्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राजे गटापुढे आवाहन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत राजे गटाला छत्री तर फलटण तालुका विधायक विकास आघाडीच्या उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाच्या दोन उमेदवारांना विमान, बॅट अशी चिन्हे मिळाली आहेत. एक अपक्ष उमेदवारास शिट्टी चिन्ह मिळाले आहे.

– सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस), भगवान दादासो होळकर (राष्ट्रवादी काँग्रेस), चेतन सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), शंभुराज विनायक पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), शरद लक्ष्मण लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानदेव बाबासो गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस), दिपक विठोबा गौंड (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवारांना छत्री चिन्ह प्राप्त झाले आहे. तर खंडेराव पांडुरंग सरक (राष्ट्रीय समाज पक्ष), विक्रम रामचंद्र माने (रासप), शंकर आत्माराम लेाखंडे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) या उमेदवारांना कपबशी चिन्ह प्राप्त झाले आहे. निशिगंध आत्माराम सस्ते (शिवसेना – उद्धव ठाकरे) यांना विमान चिन्ह प्राप्त झाले आहे.

– सोसायटी विजाभज मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
भिमराव पोपटराव खताळ (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवारांना छत्री चिन्ह प्राप्त झाले आहे. तर नानासो पोपट इवरे (शिवसेना) या उमेदवारांना कपबशी चिन्ह प्राप्त झाले आहे.

– सोसायटी महिला मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
सुनिता चंद्रकांत रणवरे (राष्ट्रवादी काँग्रेस), जयश्री गणपत सस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस), या उमेदवारांना छत्री चिन्ह प्राप्त झाले आहे. शितल महादेव कुलाळ (रासप) या उमेदवारांना कपबशी चिन्ह प्राप्त झाले आहे.

– ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
किरण सयाजी शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), चांगदेव कृष्णा खरात (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवारांना छत्री चिन्ह प्राप्त झाले आहे. तर काशिनाथ साधु शेवते (राष्ट्रीय समाज पक्ष), रविंद्र आमराव शिंदे (विरोधी आघाडीतील उमेदवार) या उमेदवारांना कपबशी चिन्ह प्राप्त झाले आहे. प्रदिप हरिभाऊ झणझणे (शिवसेना – उद्धव ठाकरे) यांना बॅट चिन्ह प्राप्त झाले आहे.

– व्यापारी – आडते मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
संजय हरिभाऊ कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), समर दिलीप जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवारांना छत्री चिन्ह प्राप्त झाले आहे. तर बाळासाहेब दयाराम ननावरे (अपक्ष) यांना शिट्टी चिन्ह प्राप्त झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!