फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची आवक घटली मात्र दर वधारले


 

स्थैर्य, फलटण दि. १४ : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या आवारातील आजच्या (मंगळवार) साप्ताहिक कांदा मार्केट मध्ये कांद्याची आवक घटली मात्र दर वधारले.

गत सप्ताहात १६३० क्विंटल (३२६० पिशवी) आवक होती, दर किमान ५०० रुपये, कमाल ४००० रुपये आणि सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल निघाले होते तर आज १०९४ क्विंटल (२१८६ पिशवी) आवक होती, किमान ७०० रुपये, कमाल ६००० रुपये आणि सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल दर निघाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!