निंबळकमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसला; ग्रामस्थांमध्ये घबराट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | सातारा |
गेली काही वर्षे निंबळक व परिसरातील शेतीमध्ये वास्तव्यास असलेला बिबट्या शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निंबळक गावात भरवस्तीत घुसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या काही वर्षांपासून निंबळक आणि टाकळवाडे गावच्या परिसरात बिबट्याचा वावर होता. या परिसरात वनविभागानेे बसवलेल्या कॅमेर्‍यांमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद झाल्यानंतर वनविभागानेे बसवलेल्या पिंजर्‍याला सुध्दा बिबट्याने हुलकावणी दिली. शेवटी वनविभागसुध्दा बिबट्याला पकडण्यात अपयशी झाले. त्यानंतर काही दिवस बिबट्या येथील ग्रामस्थांना अनेकवेळा दिसला. या काळात अनेक शेतकरी, मजूर यांच्या शेळ्या, बोकड, लहान वासरे, कुत्री बिबट्याकडून फस्त केली जात होती. वनविभाग पंचनामा करून नुकसानभरपाई सुध्दा देत होते; परंतु बिबट्या काही वनविभागाला सापडत नव्हता. गेल्या महिन्यात तर बिबट्याने कहरच केला, त्याने दीडशे किलोचा घोडाच मारला व फस्त केला; परंतु या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीती वाढवली. त्या घोडेवाल्याचा घोडा त्याच्या डोळ्यांसमोर एक नव्हे तर तीन बिबट्यांनी मारून घेऊन जाताना त्या इसमास फक्त पाहत बसण्याची वेळ त्याच्यावर आली. या घटनेमुळे निंबळक व टाकळवाडे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आणखीनच घबराट पसरली.

दरम्यान, हा बिबट्या अनेक दिवस शेतात, वस्तीवर वास्तव्यास होता; परंतु शनिवारी रात्री त्याने कहरच केला. या बिबट्याने निंबळक गावठाणमध्येच प्रवेश केला. भला मोठा बिबट्या गावात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये या बिबट्याची मोठी दहशतच निर्माण झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!