अबॅकसमध्ये बारामतीची राजनंदिनी शिंदे देशात दुसरी


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | बारामती |
१६ वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा ठाणे (मुंबई) या ठिकाणी संपन्न झाली. यामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. सायरस पुनावाला शाळेची इयत्ता दुसरीमधील विद्यार्थिनी राजनंदिनी हर्षवर्धन शिंदे हिने देशात दुसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील व प्रतिस्पर्धकांमधून सर्वात कमी वयात यश मिळवणारी विद्यार्थिनी म्हणून यश मिळवले आहे.

२०२३ मध्येही राजनंदिनीने अशाच स्पर्धेमधून देशात तिसरा क्रमांक पटकावला होता.

वर्ष २०२४ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशातील ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशाच्या विविध भागात परीक्षेच्या फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. अंतिम फेरी ठाणे येथे घेण्यात आली. डॉ. काशिनाथ घाणेकर नृत्यालय, ठाणे येथे बक्षिस समारंभ संपन्न झाला.

गणित विषयात १०० समीकरणे ५ मिनिटात सोडवून ७ वर्षाच्या राजनंदिनी हिने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला अबॅकसच्या शिक्षिका भाग्यश्री जगताप व विद्या प्रतिष्ठान शाळेतील गणिताच्या शिक्षिका प्राजक्ता आर. यांनी मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!