
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २१ : विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील दशक्रिया विधी म्हणजेच दत्तघाट परिसराची डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून दत्तघाट परिसराच्या डागडुजीचे काम सुरू आहे. तरी दत्तघाट म्हणजेच दशक्रिया विधीचे काम दर्जेदार करावे, असे निर्देश माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी दिले.
या वेळी आरोग्य सभापती सनी अहिवळे, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल नाईक निंबाळकर, बांधकाम अभियंता पी. एन. साठे, स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांची उपस्थिती होती.
