मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक; खासदार संभाजीराजे उपस्थित राहणार


 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.३०: 11वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. बुधवारी (दि.२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती हजर राहणार आहेत.यामध्ये मराठा समाजाचे समन्वयक तसेच अभ्यासक सुद्धा उपस्थित राहतील. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

इयत्ता 11 वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपर न्युमेररी पद्धतीने एसईबीसीत मराठा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने समावेश करण्यात येईल, यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मराठा समाजाची आक्रमकता पाहून उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे.

8 डिसेंबरला मोर्चाकडे लक्ष

मराठा आरक्षण वगळून भरती प्रक्रिया राबवू नये, या मागणीसाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काल पुण्यात आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय झाला असून कोल्हापुरातून सुद्धा मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. दरम्यान, या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!