महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर जयंत पाटील भाजपमध्ये आले असते’- नारायण राणे


 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये आले असते’, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचे नसते. नारायण राणेंच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, अशी टीका केली होती. जयंत पाटलांच्या या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते तर, जयंत पाटील भाजपमध्ये आले असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे,’ असे नारायण राणे म्हणाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!