स्थैर्य, पाटण, दि. ३० : सणबूरयेथील गावच्या मानाच्या गणपतीसह गावातील 151 घरगुती गणेश मूर्तींचे ग्रामपंचायतीच्यावतीने संकलन करून मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून विधिवत विसर्जन करण्यात आले. सणबूरचे उपसरपंच संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सणबूर येथे 14 गणेश मंडळे आहेत.
यंदा गावाचा मानाचा गणपती वगळता सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली नाही. गावात साधारण 300 वर घरगुती गणपतींची स्थापना झाली आहे.सणबूर येथे 5 दिवसांच्या गणेशाचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. यंदा ग्रामपंचायतीने प्रत्येक वॉर्डात फिरून घरगुती गणेशमूर्ती संकलन केले जाईल तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. त्यास सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.
उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, विवेकानंद विचार मंचचे प्रकाश मोहिते, विशाल जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मिळून गावात फिरून गणेश मूर्तींचे संकलन केले.
मानाच्या गणपतीचे 5 लोकांनी ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांच्या उपस्थितीत विधिवत विसर्जन केले.