
स्थैर्य, फलटण, दि. १८ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये फलटण शहरासह तालुक्यामधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तरी ज्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या विचारांचा बरोबर कार्यरत राहायचे आहे. अशा सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत सदस्य होऊन मराठी विचार कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले आहे.
आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत निर्माण करण्यासाठी फलटणमधील सर्वसामान्य नागरिकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी काळामध्ये नक्कीच कार्यरत राहील, असे आश्वासनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी यावेळी दिले.