स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास जिल्हाधिकारी यांची तात्काळ मंजूरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । दिनांक 1 व 2 डिसेंबर 2021 राजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा करुन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली.

प्रथम टप्यात उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील सुमारे 350 एकर क्षेत्रावर पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी देवून, उर्वरीत क्षेत्रासाठी तातडीने निधीची मागणी सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृषी विभागास दिल्या आहेत .


Back to top button
Don`t copy text!