
स्थैर्य, दि. २३: इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजलिच्या कोरोना व्हॅक्सीन कोरोनिलचे समर्थन केल्याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. IMA ने सोमवारी म्हटले की, मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया (MCI)च्या नियमानुसार, कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाचे प्रमोशन करू शकत नाही. हर्षवर्धन स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांनी नियमाविरोधात काम केले. कोरोनिलबाबत पतंजलिने केलेल्या दाव्यांचेही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने खंडन केले आहे.
काय म्हणाले WHO ?
WHO ने 19 फेब्रुवारीलाच स्पष्टीकरण दिले की, त्यांनी कोणत्याच ट्रेडिशनल मेडिसिनचे रिव्ह्यू केले नाही आणि कोणालाच सर्टिफीकेट दिले नाही. WHO साउथ-ईस्ट एशियाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
19 फेब्रुवारीला लॉन्च केले औषध
योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यादरम्यान, कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपरदेखील सादर केला होता.
रामदेव बाबांचा दावा- औषध WHO सर्टिफाइड आहे
कार्यक्रमात पतंजलिचे को-फाउंडर आणि योग गुरू रामदेव बाबा यांनी दावा केला होता की, ही आयुर्वेदिक औषध WHO सर्टिफाइड आहे. याशिवाय, त्यांनी कोरोनिलला कोरोना उपचारातील चांगले औषध असल्याचाही दावा केला. ते म्हणाले की, या औषधाचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले. यानंतर पतंजलि आयुर्वेदचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, कोरोनिलसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मास्युटिकल प्रोडक्ट सर्टिफिकेट (CPP) दिले आहे. WHO कोणत्याच औषधाला परवानगी देऊ किंवा नाकारू शकत नाही.