हिंमत असेल तर तुमचे घर असलेल्या प्रभागात माझ्या विरोधात निवडणूक लढून दाखवा : नगरसेवक पांडुरंग गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 19 ऑक्टोबर 2021 । फलटण । अशोकराव जाधव यांचे ज्या प्रभागात घर आहे. तर त्यांनी त्याच प्रभागातून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. अशोकराव जाधव एवढे मोठे नाहीत की त्यांचे नाव घेतल्याशिवाय मला तिकीट मिळणार नाही. जर खरच तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे स्वतःचे घर ज्या प्रभागात आहे, त्या प्रभागातून तुम्ही माझ्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असा प्रतिटोला नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी नगरसेवक अशोकराव जाधव यांना लगावला.

काल दि. १८ रोजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यावर आरोप केलेले होते. त्याला उत्तर देण्यासाठी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले होते. त्यावेळी गुंजवटे बोलत होते. यावेळी नगरसेवक सनी अहिवळे, किशोर नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर, सुधीर अहिवळे, भाऊ कापसे, अजय माळवे, सनी शिंदे व सद्गुरू हरिबुवा पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अशोकराव जाधव यांच्या व्यसनामुळे व इतर भानगडीमुळे तुमच्या घराचा लिलाव काही वर्षांपूर्वी निघालेला होता. आता तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ते घर सुद्धा विनापरवाना बांधलेले आहे. तुम्ही शहरातील बांधकाम व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी अर्ज व कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावता परंतु त्यातील एकाही केसचा निकाल तुमच्या बाजूने निकाल नाही. तुमच्यासाठी कोर्ट कचेरी नवीन नाही परंतु फलटण मधील चांगल्या व्यावसायिकांना ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर केसेस दाखल करता, हे फलटण मधील सर्व व्यावसायिकांना ज्ञात आहे, असेही पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.

स्वतःला ह.भ.प. म्हणून घेणारे अशोकराव जाधव हे चिकन सेंटरचे उद्घाटन करतात. अशोक जाधव हे नाव आता लावण्याऐवजी सेटलमेंट जाधव असे नाव लावणे गरजेचे आहे, असेही नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.

चक्क एका विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान माझ्या घरामध्ये येवून माझ्या शेजारी बसून विधानपरिषदेचे मत विकेलेले आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांना निवडणुकीच्या आधी पैशाचा वास सुटलेला आहे. आता ह्या पुढे जश्याच तसे उत्तर दिले जाईल, असेही नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!