उत्तर कोरेगावात औद्योगिक वसाहत नको असल्यास म्हसवडला जावू द्या; परंतु पुढच्या पिढीचा विचार शेतकर्यांनी करणे आवश्यक : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । सातारा । फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघील असणार्या पिंपोडे, नायगाव, नांदवळ व रणदुल्लाबाद येथे औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. सदर वसाहत आपल्या भागांत नको म्हणून काही शेतकरी सातारामधील नेत्यांने भेटल्याचे समजले. जर उत्तर कोरेगावमध्ये औद्योगिक वसाहत नको असेल तर त्याबाबत आपण ठरवू, नको असेल तर म्हसवडला जावू द्या. त्याबाबत माझी काही हरकत किंवा जबरदस्ती नाही. परंतु पुढच्या पिढीचा विचार शेतकर्यांनी व स्थानिकांनी करावा, गैरसमज नसावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या WhatsApp स्टेटसद्वारे पोस्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!