सोन्याचे दर घसरले तर कच्च्या तेलाची दरवाढ सुरुच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०७: अमेरिकेने नोंदवलेल्या मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकी डॉलरला बळकटी मिळाली. परिणामी डॉलरचे वर्चस्व असलेल्या धातूंचे आकर्षण कमी झाले तर आशावादामुळे तेलाच्या दरातील नफा कायम दिसून आला.

सोने: एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की अमेरिकी तिजोरीतील उत्पन्न आणि डॉलरमध्ये वाढ झाल्याने सराफा धातूचे आकर्षण कमी झाले. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.५ टक्क्यांनी मागील आठवड्यात खाली घसरले. वर्धित अमेरिकी आर्थिक आकडेवारीमुळे त्यांच्या चलनाला बळकटी मिळाली. त्यामुळे डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्यावर परिणाम झाला.

अमेरिकेच्या प्रायव्हेट क्षेत्रातील नोकर भरतीत लक्षणीय वाढ आणि अपेक्षेपेक्षा कमी बेरोजगारीचे दावे तसेच अमेरिकी सेवा क्षेत्राचा विस्तार यावरून जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत निरंतर सुधारणा सुरु असल्याचे संकेत मिळाले. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली दिसल्याने अमेरिकी बाजाराची जोखिमीची भूक वाढली आणि गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे पाठ केल्याने सोन्याने १९०० डॉलरच्या खालील पातळी गाठली. जागतिक अर्थव्यवस्थेतील वेगवान सुधारणा, वाढते तेलाचे दर, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चलनधोरणातील संभाव्य बदल यामुळे सोन्याच्या दरांवर पुढील आठवड्यात दबाव येण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल: जागतिक मागणीत वाढ आणि अमेरिकी क्रूड साठ्यातील घट यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर चार दिवसाच्या आठवड्यात २.८ टक्क्यांनी वाढले. अमेरिका आणि चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महामारीसंबंधी निर्बंध शिथिल झाल्याने तसेच जगातील कारखान्यांतील कामकाजात मजबूत वृद्धी झाल्याने तेलच्या मागणीलाही मोठी बळकटी मिळाली.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, अमेरिकी क्रूड साठ्यात ५.१ दशलक्ष बॅरलची घसरण झाली. बाजाराने २.४ दशलक्ष बॅरलची घट होण्याची अपेक्षा केली होती. मात्र या पातळीपुढे घट झाली. तसेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज व सदस्य संस्थेने येत्या काही महिन्यात जागतिक मागणी आणि जागतिक पुरवठ्यात वाढ होण्याच्या अंदाजानुसार, उत्पादन कपात शिथील करण्यावर सहमती दर्शवली. इंधनाच्या मागणीतील वाढ आणि जागतिक बाजारात इराणी तेल येण्याचे ठोस संकेत दिसत नसल्यामुळे पुढील आठवड्यात तेलाचे दर वाढते राहतील.


Back to top button
Don`t copy text!