आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गणरायाची महाआरती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फलटण येथे गणेशोत्सवानिमित्त शिवराज भोईटे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती झाली. यावेळी विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार करण्यावर विशेष भर देण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त गिरीधर सायन्स अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती झाली. शालेय वातावरणात भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

शिवराज भोईटे यांचे शाळेत आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाची महाआरती झाली. आरतीनंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

संस्कृती आणि शिक्षणाचा समन्वय

शाळेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत आणि दोन्ही संस्थांमधील समन्वय अधिक घट्ट व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सेंटर हेड सुचिता जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!